Tuesday, 28 November 2023

Maharashtra State Road Transport Corporation

*Bhairavi Digital Seva*

🚌Maharashtra State Road Transport Corporation 



E-Reservation Ticket काढून मिळेल

Concession below details

🚍 General = No Concession

🚍 Shaheed Samman Yojana = 50% Concession

🚍 Amrut Senior Citizen = 50% Concession

🚍 Ladies Concession = 50% Concession

🚍 Senior Citizen = 50% Concession

🚍 Blind = 75% Normal Bus and Shivshahi Bus 70%

🚍 Blind Escort = 50% Normal Bus and Shivshahi Bus 40%

🚍 Handicapped = 75% Normal Bus and Shivshahi Bus 70%

🚍 Handicapped Escort = 50% Normal Bus and Shivshahi Bus 40%


Fees : Ticket + 10% Extra


💢 Whatsapp group 101 💢

💢 Facebook Page 💢 

आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड

-  मोबाइल क्रमांक

ऑनलाईन E-Reservation Ticket काढून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881 




Saturday, 25 November 2023

Ayushman Bharat Health Account - ABHA Number

 Ayushman Bharat Health Account - ABHA Number


आभा हेल्थ कार्ड काय आहे?

आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.

हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.

💢 Whatsapp group 101 💢

यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.

या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल

💢 Whatsapp channel 💢

याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे कार्ड म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकाल.

या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल

💢 Facebook Page 💢 


Ayushman Bharat Health Account - ABHA Number काढून मिळेल

आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड

- आधार लिंक मोबाइल क्रमांक

ऑनलाईन कार्ड काढून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881 



Monday, 13 November 2023

ZP Satara Bharti 2023

ZP Satara Bharti 2023

Zilla Parishad Satara, NHM, ZP Satara Bharti 2023 (ZP Satara Recruitment 2023) for 97 Specialist Posts

Total: 97 जागा

पदाचे नाव: विशेषतज्ञ

शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB

वयाची अट: 70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: सातारा

Fee: ₹500/-

अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय तळ मजला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Sunday, 5 November 2023

Annasaheb Patil Loan Scheme

  भैरवी डिजिटल सेवा

मिळवा 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज




अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.

भारत हा एक जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या हि वय वर्षे 25 च्या आतील आहे. म्हणून या तरुण वर्गास कुशल बनविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे व या उत्पादन क्षमता वयोगटातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली

या  योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

सुरुवातीच्या काळात महामंडळाचे कर्ज मिळविण्यासाठी युवकांना खुप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. बँका प्रतिसाद देत नसल्याने युवकांनी कर्जासाठी केलेले अर्ज निकाली निघत नव्हते. तसेच अनुदान स्वरूपात योजना नसल्याने युवक कर्ज घेण्यास पुढे येते नव्हते. मात्र महामंडळाला उभारी देण्यासाठी शासनाने उपाययोजना केली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते.
या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.

गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी 5 वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, LLP FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

वाचकांना विनंती

आम्ही आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे त्यामुळे आमचे हे आर्टिकल तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळावा जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक असतील जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा एखादा छोटासा उद्योग सुरु करू शकतील.


आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा उद्देश्य

Annasaheb Patil Loan Scheme Purpose

  1. महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश्य आहे.
  2. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत आर्थिक सहाय्य्य पोहचवून त्यांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.
  3. योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  4. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
  5. या योजनेअंतर्गत नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
  6. योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  7. नागरिकांना स्वरोजगारासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
  8. नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये.
  9. राज्यातील बेरोजगारी संपवून राज्यात नवे उद्योग सुरु करणे

अण्णाभाऊ पाटील महामंडळ कर्ज योजना वैशिष्ट्ये

Annabhau Patil Loan Yojana Features

  • ही योजना महाराष्ट्र सरकार ने सुरु केली आहे
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याची श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन करण्यात आले आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज  नाही अर्जदार घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराचा वेळ व पैसे यांची बचत होते.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या माध्यमातून वेळोवेळी बघू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन केले गेले असल्यामुळे या योजनेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते व योग्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत कर्ज पुरविले जाते.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी

Annasaheb Patil Loan Scheme Terms & Conditions

  • सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अक्षम मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
  • दिव्यांगांकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत (पाठपोट कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रति माहे असणे अनिवार्य आहे.
  • जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
  • उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार कोणत्याची बँकेचा थकबाकीदार नसावा.
  • बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या आधिकारीक वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सर्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
  • गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता १०वी उत्तीर्ण असावी.
  • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १०% रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे लाभ

Annasaheb Patil Loan Scheme Benefits

  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्यातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज पुरविले जाते.
  • सदर कर्जावरील व्याजाची परतफेड आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत केली जाते.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज पुरविले जाते.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट्य बँकांची यादी

Annasaheb Patil Loan Bank List

  • सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित
  • लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद
  • श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या. कोल्हापूर
  • श्री. वारणा सहकारी बँक लिमि.वारणानगर
  • श्री. महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक
  • कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि.
  • श्री.आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी
  • दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमि.सिंधुदूर्ग.
  • देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद
  • द चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लिमि.चिखली,बुलढाणा
  • राजारामबापु सहकारी बँक लिमि. पेठ, सांगली
  • ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
  • दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मर्या, पनवेल
  • हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा
  • राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप.बँक लि.कागल
  • चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित,चंद्रपुर
  • राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजपूर
  • नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक मर्यादित,
  • यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
  • शरद नागरी सहकारी बँक मर्यादित
  • लोकमंगल को-ऑप.बँक मर्यादित सोलापुर
  • प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
  • पलूस सहकारी बँक पलूस
  • रामेश्वर को.ऑप.बँक मर्यादित
  • रेंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल
  • कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड
  • श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक
  • जनता सहकारी बँक अमरावती
  • दि अमरावती मर्चट को-ऑप.बँक मर्यादित
  • अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
  • जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
  • अरिहंत को-ऑप बँक
  • दि कराड अर्बन को-ऑप बँक
  • विदर्भ मर्चेट को-ऑप.बँक मर्यादित, हिंगणघाट
  • दिव्यंकटेश्वरा सह.बँक लि. इचलकरंजी
  • सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर
  • सांगली अर्बन को.-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली
  • दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
  • गोदावरी अर्बन बँक
  • श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि.
  • श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.
  • नागपुर नागरी सहकारी बँक
  • सातार सहकारी बँक
  • दिहस्ती को.ऑप. बँक लिमी.
  • दि बुलडाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलडणा
  • अनुराधा अर्बन को-ऑप.बँक लिमी.
  • जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया
  • निशीगंधा सहकारी बँक
  • महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. लातूर
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा
  • येस बँक लि.Ves Bank LTD.)
  • रायगड सहकारी बैंक लिमिटेड

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना

Annasaheb Patil Loan Scheme Individual Interest Reimbursement

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांने यापूर्वी, या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या जाती/गटासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अश्या जाती/ गटांतील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
  • दिनांक 01 जानेवारी, 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल
  • लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (जे रु. 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र) अथवा वैयक्तीक ITR (पती व पत्नीचे) प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न (Gross Income) ग्राह्य धरण्यात येईल व निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही
  • या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या व CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल
  • दिव्यांगासाठी योजनानिहाय एकूण निधीच्या 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा
  • महामंडळाचे योजनेअंतर्गतचा लाभ हा कर्ज उचलल्यापासून 5 वर्षाकरीता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल त्यासाठी लागू असेल
  • कर्ज रक्कम रु. 10 लाखाच्या मर्यादेत, व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. १२% असेल, यानुसार जास्तीत-जास्‍त रु. 3 लाखापर्यतच्या व्याज रकमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येईल

गट कर्ज व्याज परतावा अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना

Annasaheb Patil Group Loan Interest Reimbursement Scheme

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थी गट सदस्यांनी यापूर्वी, या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • दिनांक 01 जानेवारी, 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल. परंतू वयाची अट कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापना केलेल्या एफ.पि.ओ. व दिव्यांग गटांना लागू असणार नाही
  • लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र) अथवा कुटुंबाचे ITR प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न (Gross Income) ग्राह्य धरण्यात येईल व निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी गटाने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या व CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
  • गटातील प्रत्येक लाभार्थी सदस्य हा आर्थिकदृष्टया मागास असावा.
  • या योजने अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.
  • या योजनेअंतर्गत कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटाकरीता असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे.
  • दिव्यांगासाठी योजनानिहाय एकूण निधीच्या 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट प्रकल्पासाठी गटाचे 100 टक्के लाभार्थी- सदस्य दिव्यांग असावेत. गटातील महामंडळासोबत व्यवहार करणारा प्राधिकृत प्रतिनिधी हा दिव्यांग लाभार्थी-सदस्य असावा.
  • व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. १२% असेल.
  • अर्जदार गटास केवळ एकाच गट योजनेखाली अर्ज करता येईल. मात्र एका योजनेखाली आर्थिक मर्यादेचे विभाजन न करता एकाच रकमेसाठी अर्ज सादर करावा.

गट प्रकल्प कर्ज अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थी गट सदस्यांनी यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • गटाने (गटाच्या प्राधिकृत संचालक प्रतिनिधीद्वारे) योजनेअंतर्गत सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेब प्रणालीवर नोंदणी करुन अर्ज करणे अनिवार्य असेल
  • अर्जाकरीता वेब पोर्टलवर आधारलिंक मोबाईलवर O.T.P. द्वारे, मोबाईल ॲप द्वारे अथवा तत्सम U.I.D. युक्त प्रणालीद्वारे नोंदणी करावयाची आहे. यासाठी लाभार्थ्यांने सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर आधार नंबर सोबत आद्यावत करावा, जेणे करून निर्माण होणारा O.T.P., योजनेसाठी अर्ज करतेवेळी वापरता येईल
  • F.P.O. गटातील, ज्या समाजातील लोकांना इतर कोणतेही महामंडळ अस्तित्त्वात नाही अशा सदस्यांची व संचालकांची संख्या ही किमान 60 टक्के असणे अनिवार्य असेल
  • गटातील एकाच “प्राधिकृत संचालक” प्रतिनिधीने महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित असेल व अशा अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक राहील. हा संचालक प्रतिनिधी हा त्याच गटाचा लाभार्थी सदस्य असणे अनिवार्य असेल. आवश्यकतेनुसार जर नोंदणीकृत अधिकारी बदलावयाचे असेल तर गटाने आवश्यक ठरावाची प्रत ऑनलाईन अपलोड करावी व त्याकरीता रु. 500/- शुल्क आकारण्यात येईल
  • आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे स्पष्टीकरण- लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र धारक व्यक्ती) अथवा कुटुंबाचे ITR (पती व पत्नी) प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न रु. 8 लाखाच्या मर्यादेत असावे परंतू निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही

Annasaheb Patil Loan Documents List

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रकल्प अहवाल

बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचा फोटो
Annasaheb Patil Loan Apply Online अधिकारीक वेबसाईट


भैरवी डिजिटल सेवा

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881 








Friday, 3 November 2023

लेक लाडकी योजना

    मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

    त्यानुषंगाने सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील." अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" ही

सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे राहतील.:-

१. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.

२. मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

३. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.

४. कुपोषण कमी करणे.

५. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लेक लाडकी योजनेचा GR 👈

    सदर योजने अंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

अ) अटी व शर्ती:-

१) ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

२) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील,

३) लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील

४) पालकाचे आधार कार्ड

लेक लाडकी योजना

५) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

६) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत )

) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

८) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied) ९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ("अ" येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार

(9) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे (स्वयं घोषणापत्र).

(१०) सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

लेक लाडकी योजनेचा अर्ज👈