सरकारी भरती, इतर भरती, विविध योजना, अपंग योजना, कॉम्पुटर - लॅपटॉप सेल सर्व्हिस, प्रॉपर्टी सेल सर्व्हिस आणि ई-फॉर्म सर्व्हिस इत्यादींची माहिती आपल्या ब्लॉग मध्ये मिळेल
🙏दिव्यांगांना दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) ओळखपत्रावर एस. टी. बसमध्ये मिळणार सवलत..
केंद्र सरकारतर्फे (Central Government) दिव्यांगांना दिले जाणारे वैश्विक
ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
बसेसमध्ये (MSRTC Bus) प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य धरण्यात यावे, असे
राज्याचे महाव्यवस्थापक यांनी पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील सर्व
जिल्ह्याच्या विभाग नियंत्रकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.
पत्रानुसार सद्यस्थितीत ज्या लाभार्थ्याकडे वैश्विक ओळखपत्र आहे अशा
लाभार्थ्यांना राष्ट्रीय परिवहन विभागातर्फे प्रवास भाड्यात वाहकाद्वारे
सवलत नाकारली जात असून, त्यास प्रवासादरम्यान बसमधून उतरविले जात
असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे
दिव्यांगांना दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य
मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य
धरण्यात यावे, याबाबत आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षीय
कर्मचारी, वाहकांना सूचना देण्यात याव्यात व याबाबत कोणतीही प्रवासी तक्रार
उद्भवणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे पत्रकात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment